घरमहाराष्ट्रनाशिकगौण खनिजचे अधिकार पुन्हा निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे; वर्षभरात निर्णय मागे

गौण खनिजचे अधिकार पुन्हा निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे; वर्षभरात निर्णय मागे

Subscribe

नाशिक : नाशिकचा गौण खनिज विभाग हा कायमच चर्चेचा विषय आहे. गौण खनिज विभागातील एकूणच कारभार पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडील अधिकार काढले होते. हे अधिकार वर्षभरापासून उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा वर्षभरानंतर गौण खनिजचे अधिकार नवनियुक्त निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे देण्यात आले आहे.

गौण खनिज विभागाचा कारभार तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे गतवर्षी जिल्ह्यातील खाणपट्टे बंद करण्याचे आदेश निघत असताना ते आदेश काढणारे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून प्रशासकीय निकड व तातडीची बाब म्हणून गौण खनिज उत्खनन व त्याविषयक बाबींचे कामकाज काढून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी १३ सप्टेंबरला स्वत:कडे घेतले होते. गौण खनिज विभागाचे अधिकार दोन्हीही जबाबदार अधिकार्‍यांकडून काढून घेण्यात आल्याने याबाबत उलट सुलट चर्चाही रंगल्या. सारूळ प्रकरणानंतर तर खुदद राज्याच्या महसूल मंत्र्यांकडूनच गौण खनिज विभागावर नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार सांभाळण्यास अधिकारी इच्छुक नाहीत.

- Advertisement -

मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी या विभागाचा कारभार उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे सोपवला होता. दराडे यांच्याकडे इतर कामांचा असलेला ताण पाहता हा कारभार आपल्याकडून काढून घेण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. नुकताच निवासी उपजिल्हाधिकारीपदी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून या विभागाचा कारभार पुन्हा एकदा त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -