घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअर्ली द्राक्षबागांवर क्रॉप कव्हरसाठी सबसिडी द्यावी

अर्ली द्राक्षबागांवर क्रॉप कव्हरसाठी सबसिडी द्यावी

Subscribe

दीपिका चव्हाण यांचे शरद पवारांना निवेदन

तरसाळी:बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष पिकाचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना मागील तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे हजारो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या नुकसाणीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या अर्ली द्राक्ष बागांवर क्राप कव्हर(आच्छादन) टाकण्यासाठी राज्य शासनाकडून सबसिडी मिळावी या आशयाचे निवेदन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

बागलाण तालुका हा अर्ली द्राक्षांची पंढरी तसेच म्हणून उत्कृष्ट उत्पादन घेणारा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस,गारपीट आणि निसर्गाच्या लहरीपणाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसुन हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील अर्ली द्राक्षांचे उत्पादन घेणारा द्राक्ष बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडून मेटाकुटीला आले आहेत.

- Advertisement -

मागील तीन दिवसांपूर्वी तालुक्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागांसह कांदा, मका, गहू, हरभरा व भाजीपाला आदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

बागलाण तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी दरवर्षी एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत असल्याने एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून ही एक रुपयाही हातात न पडता नुसती पदरी निराशाच येत असल्यामुळे शेतकर्‍यांनमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. दरवर्षी द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मोठ्या कष्ट घेतात, मोठा खर्च करतात, शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र ऐनवेळी अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यादेखत उद्ध्वस्त होतात आणि शेतकर्‍यांचे होत्याचे नव्हते होते.

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादन घेणारा शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा हात देणे अत्यंत आवश्यक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व निसर्गाचा लहरीपणाचा अशा नैसर्गिक संकटाणावर मात करण्यासाठी बागांमध्ये द्राक्ष पीक तयार होत असताना द्राक्ष बागांवर क्राप कव्हर(आच्छादन)टाकण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव अनुदान मिळावे त्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निर्देश देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -