Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक बागलाण तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बागलाण तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्येची चर्चा

Related Story

- Advertisement -

बागलाण तालुक्याच्या विरगाव येथील धनाजी अर्जुन गांगुर्डे (वय ५६) या शेतकऱ्याने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.८) सकाळी घडली. आत्महत्येमागील कारणाचा उलगडा झालेला नसला तरीही, पीकांचं नुकसान आणि वाढता कर्जाचा बोजा, यामुळे गांगुर्डे यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.

याबाबत माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. दरम्यान, गांगुर्डे यांनी एका बँकेकडून दीड लाखांचं कर्ज घेतलेलं होतं, तसेच कोबी व फ्लॉवर लागवडीसाठी सुमारे ५ लाख उसने घेतलेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisement -