गर्भवती विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मधुबन कॉलनीत घडली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गीता अनिल पंडित (१८ रा. मधूबन कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गीता हिने शुक्रवारी (ता.१२) राहत्या घरात कोणीही नसल्याचे बघून आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच सासरे गणेश पंडित यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. गीता आणि अनिलने दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेला आहे. ती आठ महिन्यांची गरोदर आहे. पंचवटी पोलीस तपास करीत आहेत.