घरमहाराष्ट्रनाशिकधक्कादायक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर मुलीसह पत्नीने संपवले जीवन

धक्कादायक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर मुलीसह पत्नीने संपवले जीवन

Subscribe

नाशिकच्या विनय नगर भागातील घटना

नाशिक : कोराेनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नव्हता, त्यात ७ वर्षीय चिमुकली वडिलांची सतत आठवण काढत होती. त्यानंतर वडील जिकडे गेले तिकडे आपण जाऊ असे चिमुकलीने सांगितल्यानंतर तिच्या नैराश्यात सापडलेल्या मातेने चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली.

सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, नाशिक) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १) राेजी सुजाता व अनया यांनी संगनमताने बोलून आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून, सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -