घरमहाराष्ट्रनाशिकसाखर कारखान्यांपुढे ‘वाढीव’ उत्पादनाचे संकट

साखर कारखान्यांपुढे ‘वाढीव’ उत्पादनाचे संकट

Subscribe

साखर निर्यातीबाबतची कारखान्यांची नाखुशी आणि ३१०० रुपयांच्या खाली विक्री न करण्याचा साखर आयुक्तालयाचे आदेश या दुहेरी कात्रीत पुढील हंगामाअखेर तब्बल ५० लाख टन साखर पडून राहण्याची भीती आहे.

साखर निर्यातीबाबतची कारखान्यांची नाखुशी आणि ३१०० रुपयांच्या खाली विक्री न करण्याचा साखर आयुक्तालयाचे आदेश या दुहेरी कात्रीत पुढील हंगामाअखेर तब्बल ५० लाख टन साखर पडून राहण्याची भीती आहे. या स्थितीत अतिरिक्त उत्पादनाने साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहे. परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अधिकच गाळात सापडण्याची चिन्हे आहेत.

यंदा झाले विक्रमी गाळप

गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ, हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल, असा साखर क्षेत्रातून वर्तविलेला अंदाज चुकवत यंदादेखील साखर उत्पादनाने १०७ लाख टनांच्या घरात उडी घेतली आहे. राज्यातील १९५ साखर कारखान्यांचा साखर हंगाम आटोपला आहे. राज्यभरातून ९४५ लाख टन उसाचे गाळप झाले असून तब्बल तब्बल १०७ लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही कोल्हापूर, सांगली, सातारा या उसाच्या आगारात यंदा २५ टक्के उसाचे क्षेत्र वाढले. त्याचा परिणाम साखरेचे उत्पादन वाढण्यात झाला. जवळपास गेल्यावर्षी इतकेच उत्पादन यंदाही होईल, असे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील भागात हुमणीची तीव्रता अधिक होती. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मध्यम स्वरुपाचा होता. दुष्काळी स्थिती व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे राज्यात ९५ लाख टनांपर्यत साखर उत्पादनाचा सुधारीत अंदाज वर्तवला. हा अंदाज चुकीचा ठरवत गेल्या वर्षी इतकेच उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के इतका होता. यंदा तो ११.२३ टक्के आहे. अजूनही २९ कारखान्यांचे गाळप सुरू असल्याने, गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाच्या जवळ पोहोचू असे दिसत आहे.

- Advertisement -

कारखाने व गाळपाची स्थिती

१९५ – साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी
९४५.०६ – लाख टन उसाचे गाळप
१०६ लाख १० हजार टन – साखर उत्पादित
९५३.७३ लाख टन – ऊसाचे २०१७-१८ मध्ये गाळप
१०७ लाख टन – साखरेचे गेल्या वर्षी विक्रमी उत्पादन
११५ लाख टन – साखरेचे उत्पादन यंदा होण्याचा अंदाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -