घरमहाराष्ट्रनाशिकसावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या

Subscribe

पोलीस आयुक्तांच्या नावाने दहा पानी चिठ्ठी; घटनेने शहरात खळबळ

राजे संभाजी इनडोअर स्टेडीयमशेजारील सेतू कार्यालयाजवळ एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत ही आत्महत्या सावकारी जाचाला कंटाळून केल्याचे समजते.

मयत महेंद्र तुळशीराम पाटील

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र तुळशीराम पाटील (49, रा.पाटीलनगर, नवीन नाशिक) यांचा मृतदेह गुरुवारी सिंहस्थनगर येथील राजे संभाजी स्टेडियम परिसरातील सेतू कार्यालयाजवळ आढळून आला. अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या मृतदेहाजवळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाने आठ ते दहा पाने लिहिलेली एक व एक स्वतंत्र अशा दोन चिठ्ठी आढळून आल्या आहेत. त्यांत खासगी सावकारांची नावे, संपर्कक्रमांक व त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा तपशील आढळला. शिवाय व्याजाने घेतलेले हे पैसे परत करता येत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहिलेले आढळले. पोलिसांनी याठिकाणी असलेल्या एका बॅगेसोबतच अन्य साहित्यावरून या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेतला.

- Advertisement -

संबंधित सावकारांच्या विरोधात पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून आहे. तसेच ही आत्महत्या की घातपात याचाही पोलीस तपास करत आहेत.

राजे संभाजी स्टेडियमवर पहाटेपासूनच क्रिडाप्रेमींबरोबरच व्यायामासाठी येणार्‍यांची वर्दळ असते. या ठिकाणी हा मृतदेह पडलेला असताना दुपारपर्यंत कोणाच्याच लक्षात कसे आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत पाटील हे चार दिवसांपासून मुंबई येथे होते, तर बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याचे समजते.

- Advertisement -

दोषींवर निश्चितच कारवाई केली जाणार

राजे संभाजी स्टेडियम येथे आढळून आलेला मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही चिठ्ठी संबंधित व्यक्तीनेच लिहिली होती की, काय याचा तपास करुन यात असलेल्या इसमांची चौकशी त्यानंतरच करण्यात येणार असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाणार आहे. – श्रीपाद परोपकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -