घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात भिक्षेकर्‍यांचा सर्व्हे; धर्मादाय आयुक्तांचा उपक्रम

नाशकात भिक्षेकर्‍यांचा सर्व्हे; धर्मादाय आयुक्तांचा उपक्रम

Subscribe

नाशिक : शहरातील समाजव्यवस्थेत दुर्लक्षित व उपेक्षित आयुष्य जगत असलेल्या भिक्षेकर्‍यांचा धर्मादाय आयुक्तालयातर्फे सव्हेर्र् करण्यात येत आहे. त्यासाठी मराठा विद्या प्रसारक संचलित समाजकार्य महाविद्यालयाचे सहकार्य घेण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक शहरात ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यासाठी नाशिक विभागाचे धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी पुढाकार घेतला आहे.

नाशिक शहरात अलिकडच्या काळात भिक्षेकर्‍यांची संख्या वाढली आहे. विशेषतः पंचवटीतील धार्मिक स्थळे, शहरातील सिग्नल्स येथे भिक्षेकर्‍यांची संख्या मोठी आहे. नवनियुक्त धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी याविषयी माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला. भिक्षेकर्‍यांची संख्या किती आहे? त्यांच्या काय अडचणी आहेत? याबाबत माहिती संकलनासाठी त्यांनी समाजकार्य समाजकार्य महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला सर्व्हे करण्याचे आवाहन केले. त्यानुसार नाशिक विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्रा. जगताप यांच्यासह विद्यार्थ्यांची सहविचार बैठक झाली. या बैठकीत शहरातील भिक्षेकर्‍यांचा सर्व्ह करण्याचे ठरविण्यात आले.

- Advertisement -

धर्मादाय सहआयुक्त अकाली म्हणाले, भिक्षेकर्‍यांचा सर्व्हेनंतर काय करायचे ते ठरविले. भिक्षेकर्‍यांची माहिती तरी आपल्याकडे असली पाहिजे. तरच त्यांच्यासाठी योजना अथवा उपाययोजना राबवू शकतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा एक भाग म्हणून ही मोहीम यशस्वी करावी.

निराधार महिलेला मिळाला वैद्यकीय आधार

भिक्षेकर्‍यांचा सर्व्हे करीत असतानाच विद्यार्थ्यांना नाशिकरोड येथे एक असहाय वृध्दा व तिची मुलगी आढळून आली. मुलीला आजारपणामुळे यातना होत असतानाही पैशाअभावी ती उपचार घेउ शकत नव्हती. ही बाब धर्मादाय आयुक्तालयाला समजताच सहआयुक्त अकाली यांनी धर्मादाय रुग्णालयांना मदतीचे आवाहन केले. काही वेळातच नामको चॅरीटेबल ट्रस्टची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली.यावेळी निराधार वृध्देने धर्मादाय यंत्रणेमुळेच उपचार शक्य झाले, अशा भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -