घरमहाराष्ट्रनाशिकअंगावर डिझेल ओतून घेत पोलिसांना शिवीगाळ

अंगावर डिझेल ओतून घेत पोलिसांना शिवीगाळ

Subscribe

गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

चोरीच्या गुह्यात ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास एकाने शिवीगाळ करीत तुम्हाला कामाला लावतो,अशी धमकी देत थेट अंगावर डिझेल ओतून घेत गोंधळ घातला. ही घटना संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली. या घटनेत कुटूंबियांनीही संशयीतास मदत केल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सागर गुंजाळ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित महेश भारत कटारिया, त्याचे मित्र व कुटूबियांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या गुह्यात अजय घुले या संशयितास सातपूर पोलिसांनी अटक केले आहे. संबधिताच्या कबुली जबाबावरून बुधवारी (दि.२२) सकाळी पोलीस पथक संशयित कटारीया याच्या घरी गेले. त्यावेळी कटारिया, त्याचे मित्र आणि कुटूंबियांनी आडराओरड करीत कारवाईस विरोध केला. पोलीसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त कटारिया याने पथकास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत तुम्हाला कामाला लावतो, अशी धमकी देत ज्वलनशील डिझेलची कॅन अंगावर ओतून घेतली. पोलिसांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, डिझेल कॅनही जप्त केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -