घरमहाराष्ट्रनाशिकविनयभंग करणार्‍याची पोलिसांनाही धक्काबुक्की

विनयभंग करणार्‍याची पोलिसांनाही धक्काबुक्की

Subscribe

उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकरोड भागात महिलेचा विनयभंग करणार्‍या युवकाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांचीच गच्ची धरून त्यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (ता. २९) नारायण बापूनगर येथील एका महिलेला वसीम नईम शेख (३०) हा त्रास देत असल्याने त्या महिलेने उपनगर पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. या घटनेचा राग आल्याने त्याने रविवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहा वाजता महिलेच्या दरवाजासमोर जाऊन पोलिसांत तक्रार का केली म्हणून शिविगाळ करत अश्लिल हावभाव करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
यावेळी घाबरलेल्या महिलेने पोलिसांना फोनद्वारे या घटनेची माहिती दिली असता याच परिसरात गस्तीसाठी असलेले पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी वरीष्ठांच्या आदेशाने वसीम यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता वसीम व त्याचे ७ ते ८ नातेवाईक यांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की करत शिविगाळ केली. एका पोलिसाची गच्ची पकडून दमदाटी केली. वसीमच्या नातेवाईकांनी पोलिसांना शिविगाळ केली.
शेख याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी भदाने करत आहेत. पोलिसांना धक्काबुक्की व शिविगाळ करत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गणपत जाधव हे तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -