घरताज्या घडामोडीमालेगावात  कोरोना संशयितांचे चेकअप, परिसराची पाहणी करुन कारवाई : छगन भुजबळ 

मालेगावात  कोरोना संशयितांचे चेकअप, परिसराची पाहणी करुन कारवाई : छगन भुजबळ 

Subscribe

नाशिकमध्ये आतापर्यंत एकही मृत्यू  झालेला नव्हता परंतु बुधवारी मालेगांव येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी काळजी घेतच आहोत. जेथे जेथे रुग्ण सापडतील तेथे संपूर्ण चेकअप करण्यात येईल व परिसराची पाहणी करुन कारवाई केली जाईल,असे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मालेगांवात दुर्देवाने कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चार ते पाचजण संशयित रुग्ण सापडले आहेत. जीवन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधीतांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. सिव्हील हॉस्पिटलमधील इतर रुग्णांची सोय केली जाईल

- Advertisement -

जिल्हाधिकारी सूरज मांढरे व कृषी मंत्री दादाजी भुसे मालेगांवमध्ये आहेत. 300 ते 400 लोक कामाला लावुन ते लोक जेथे होते त्या भागातील लोकांची चाचणी केली जाईल. व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. ती व्यक्ती कोठून प्रवास करुन आली असे काही दिसुन येत नाही. त्यामुळे चिंतेची बाब आहे.  लोकांमध्ये हा कोरोना इकडुन तिकडे पसरला आहे की काय, एक तर त्या ठिकाणी कर्युाव अधिक कडक केला जाईल तसेच कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशासनास हा निर्णय घ्यावा लागत आहे. आपण त्यास सर्वांनी साथ द्यावी असे भुजबळ यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई कोणीही असो या सर्वांना त्या त्या धर्मगुरुंनी आपआपल्या समाजाला अपिल केले आहे की आपण आपल्या घरात बसुन पुजा अर्चा करा. एकत्रित येऊ नका त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो आहे. आपण ऐकले नाही तर हे हाताच्या बाहेर जाईल. लोकांनी सूचना ऐकल्या नाही तर मंदीर, मस्जिद, भाजीबाजारात मोठया प्रमाणात एकत्र आलात तर मोठी अडचण निर्माण होईल.

- Advertisement -

राज्यशासन व पोलीस प्रशासनास मदत करा. आपल्या आजुबाजुस एखादा रुग्ण आढळून आला तर प्रशासनास कळवा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  राज्यातील जनतेस केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -