घरताज्या घडामोडीतडीपार गुंडाला अटक

तडीपार गुंडाला अटक

Subscribe

नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणार्‍या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई मोतीराम चव्हाण यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अश्वमेध नगर, पेठरोड येथील दीपक किसन चोथे (वय ३२) यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चोथेविरोधात म्हसरुळ व पंचवटी पोलीस ठाण्यात धमकावणे, स्फोटक पदार्थ बाळगणे, शांतता भंग करणे, चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या कारवाईमुळे नाशिक शहर पोलिसांनी त्यास नाशिक शहर व जिल्ह्यातून १ जुलै २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी तडीपार केले होते. तरीही, तो विनापरवानगी शहरात वास्तव्य करत होता. पोलिसांनी त्यास अटक केली असून, तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -