घरमहाराष्ट्रनाशिकनिमगाव जाळी : लाच घेतांना तलाठी, कोतवाल अटकेत

निमगाव जाळी : लाच घेतांना तलाठी, कोतवाल अटकेत

Subscribe

वारसा हक्काची नोंद करण्यासाठी स्वाती बबनराव झुरळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे या दोघांना चार हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले रंगेहाथ

वारसा हक्काची नोंद करण्यासाठी निमगाव जाळी येथील स्वाती बबनराव झुरळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे या दोघांना चार हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे एका तक्रादाराच्या नातेवाईकाच्या वारस हक्काची नोंद करायची होती.त्यासाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात वारस हक्काची नोंद करण्यासाठी वारंवार चकरा मारत होता.परंतु,रोज नवे कारण सांगून तलाठी झुरळे या नोंद करण्यास टाळाटाळ करत होत्या. ती वारस हक्काची नोंद करण्यासाठी लाचखोर स्वाती झुरळे व तिचा हस्तक लाचखोर संदीप तांबे यांनी तक्रादाराकडे 4 हजार रुपयांची मागणी केली होती.

वारंवार मागणीला वैतागल्याने तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी थेट संगमनेर गाठले.लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता कोतवालाची झाडाझडती घेतली.त्यांच्याकडे 4 हजार रुपये आढळून आले. यावेळी पांडे आणि झुरळे यांच्या मागणीनुसार जे काही घडले, त्यानुसार सापळा रचून या दोघांना लाचलुचपतच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -