जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन

या आंदोलनात माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि टीडीएफचा सहभाग

 राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ‘जुनी पेन्शन आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणा देत शिक्षकांनी एनपीएसला विरोध दर्शवला.

या आंदोलनात माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि टीडीएफचा सहभाग होता. जिल्ह्यातल्या शिक्षक संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत जिल्ह्या परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. यावेळी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.