घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिक्षक, विद्यार्थी रोखणार सायबर गुन्हेगारी; काय आहे नाशिक पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन?

शिक्षक, विद्यार्थी रोखणार सायबर गुन्हेगारी; काय आहे नाशिक पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन?

Subscribe

नाशिक : शहरात गुन्हेगारीसह सायबर गुन्हेगारीत वाढ झाली असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना सायबर साक्षर करुन सायबरदूत बनविले जाणार आहे. हे विद्यार्थी सायबर गुन्ह्यांविरोधी जनजागृती करणार आहेत. सोमवारी (दि.१) शहर पोलीस ३०० हून आधिक विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

ऑनलाइन फसवणूक करणे, मोबाईल हॅक करुन डेटा चोरी करणे, अश्लिल चॅटिंग व व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करणे यासह टीमव्ह्यवर, ऐनीडेस्कसारखे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून बँकखात्यासह मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवत परस्पर रक्कम काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत. असे गुन्हे टाळण्यासाठी सायबर पोलिस उपाययोजना व जनजागृती करत असले, तरी सर्वयामान्यांत तेवढी जागरुकता वाढलेली नाही. तिच वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सायबर साक्षर व सायबरदूत ही संकल्पना सुरु केली आहे. तिचा शुभारंभ महाराष्ट्रदिनी १ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता शहर पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज हॉलमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळा घेऊन करण्यात आले.  यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे व सायबरचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये शहरातील विविध शाळा व कॉलेजमधील जवळपास ३०० शिक्षक व विद्यार्थी सायबरदूतचे प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

- Advertisement -

अशी केली जाणार जनजागृती

सायबर जनजागृती कार्यशाळेत सहभाग नोंदविणार्‍यास सायबरदूतचे कामकाज कसे करावे, याबाबत सायबर तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी व अंमलदार मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षित सायबर दूत शहरतील नागरिक, शाळा व कॉलेजेसमधील इतर विद्यार्थ्यांना सायबर साक्षर करतील. लागणारे साहित्य पोलीस पुरविणार असून ’सायबर दूत’चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र व सायबरदूत चा बॅच देण्यात येणार आहे. बँच मिळालेले सायबरदूत स्वतः सायबर शिक्षित झाल्याने समाजातील इतर घटकांना सायबर साक्षर करतील. सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करतील. विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम करुन व्याख्यान देतील. या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना आवश्यक मदत करतील.

इथे करा तक्रार 

नागरिकांनी आपली ऑनलाइन फसवणुक झाल्यास तत्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वरील www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर आणि सायबर हेल्पलाईन नंबर 1930 यावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -