नाशिक शहरात लसीकरण नोंदणीत तांत्रिक चुका; लसवंतांची नावं लस न घेतलेल्या यादीत

लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा, ७ हजार कोरोना योद्ध्यांची नावं लस न घेतलेल्यांच्या यादीत

नाशिक : जिल्ह्यात कोरोनापासून बचाव करणार्‍या कोरोना योद्ध्यांनी कोरोना लसीचे पहिला व दुसर डोस घेतला असतानाही कोरोना पार्टलवरच्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदीत गोंधळ झाला आहे. हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असताना ७ हजार कोरोना योद्ध्यांनी लसीचे दुसरे डोस न घेतल्याचे नोंदणीत म्हटले आहे. प्रत्यक्षात या कोरोना योद्ध्यांनी लसी घेतले आहे. विशेष म्हणजे, तांत्रिक गोंधळ चुकीचे नाव आणि चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदवण्यात आल्याने झाला आहे. आता चुकीची नावे व चुकीचा मोबाईल क्रमांक दुरुस्त केला जात आहे.

10 जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी दुसरा डोसच घेतला नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्करसह नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत. अद्याप जिल्ह्यातील जवळपास ७ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी लसीकरण अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता जिल्ह्यातील ६२ हजार ३५१ हेल्थ केअर वर्कर असून, सर्वांनी लस घेतली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी फरक दिसून आला आहे. सुरुवातीला आरोग्य विभागातर्फे कोविड पोर्टलवर लसीकरणाची नोंदणी केली जात आहे. त्यानंतर पोर्टलवर संबंधित व्यक्ती नोंद करु लागले. त्यामध्ये चुकीची नावे आणि मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदवण्यात आला. परिणामी, पहिला आणि दुसरा डोस घेणारे हेल्थे वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यामध्ये फरक दिसून आला. प्रत्यक्षात सर्व वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले आहे.

तीन दिवसांत २७,३३८ जणांना बूस्टर डोस

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार (दि.१०) पासून कोविड लसीची प्रतिबंधात्मक (प्रिकॉशन डोस) मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यास ६०९ सेंटरवर सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ३ हजार ८८६ जणांनी बूस्टर डोस देण्यात आला. मंगळवारी ११ हजार ९७२ जणांना डोस देण्यात आला. तर बुधवारी ११ हजार ४८० जणांना बूस्टर डोस देण्यात आला. त्यात ५ हजार १७७ हेल्थ केअर वर्कर, ४ हजार ३६४ फ्रंटलाईन वर्कर आणि १ हजार ९३९ वयोवृद्धांचा समावेश आहे.

सर्व आरोग्य अधिकार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. कोविड पोर्टलवर नोंदणीत चुकीची नावे व मोबाईल क्रमांक नोंद झाल्याने ७ हजार फरक दिसून आला आहे. डोस घेतलेल्या हेल्थ वर्कर्सचा शोध घेऊन नावे व मोबाईल क्रमांक दुरुस्त करुन नव्याने नोंदणी केली जात आहे.
– कैलास भोये, लसीकरण अधिकारी, नाशिक