घरमहाराष्ट्रनाशिककिशोरवयीन विद्यार्थ्यांना मिळाले जीवन कौशल्याचे शिक्षण

किशोरवयीन विद्यार्थ्यांना मिळाले जीवन कौशल्याचे शिक्षण

Subscribe

मैत्री प्रकल्पांतर्गत मुंढेगावला कार्यशाळा

मैत्री प्रकल्पांतर्गत ‘किशोरवयीन आरोग्य आणि जीवन कौशल्य शिक्षण’ या विषयावर मुंढेगाव येथील शासकीय इंग्लिश मिडीयम निवासी आश्रमशाळेत विशेष कार्यशाळा घेण्यात आली. किशोरवयीन मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा या हेतून ही कार्यशाळा घेण्यात आली.

महिंद्रा आणि महिंद्रा लि. इगतपुरी, यश फाऊंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने इगतपुरी आणि सिन्नर तालुव्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील ८वी, ९वी आणि दहावीतील किशोरवयीन मुला-मुलींकरिता ही कार्यशाळा घेण्यात आली होती. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद (भा.प्र.से) यांच्या सौजन्याने ही कार्यशाळा मैत्री या प्रकल्पा अंतर्गत आयोजित करण्यात आली.

- Advertisement -

उदघाटनप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्रा लि. इगतपुरीचे जयंत इगले, गौरव दांडेकर, शासकीय इंग्लिश मिडीयम निवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका जाधव, यश फौंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांची मुलांना सविस्तर माहिती मिळावी आणि या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना मैत्री प्रकल्पांर्गत एक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यांचा उज्वल भविष्य घडविण्यासाठी शासकीय व अनुदानित ८वी, ९वी, १०वी इयत्तेतील किशोरवयीन मुला-मुलींकरिता सदर मैत्री प्रकल्पांतर्गत किशोरवयीन मुला-मुलींकरिता जीवन कौशल्य शिक्षण प्रशिक्षण कार्यकम राबविण्यात आला. कार्यशाळेत व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, स्व-विकास, जीवन कौशल्य, नेतृत्व विकास, स्त्री-पुरुष समानता, किशोरवयीन समस्या व त्याचे निवारण या विषयावर रविंद्र पाटील, अनंत निकम, प्राची खरे, शुभांगी खैरनार, वनिता पगारे यांनी विविध गट उपक्रम व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रशिक्षणामध्ये येण्याआधी व्यासपीठावर सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता. मात्र या दोन दिवसातील प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला. या जीवन कौशल्याचा उपयोग नक्कीच होईल. सदर कार्याशाळेमध्ये इगतपुरी आणि सिन्नर तालुव्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -