घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतहसिलदारांचे आज सामुहीक रजा आंदोलन

तहसिलदारांचे आज सामुहीक रजा आंदोलन

Subscribe

यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू माफियांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने मंगळवारी सामुहीक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले.

नायब तहसिलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोशे यांना अवैध वाळू वाहतूकिबाबत माहीती मिळताच ते कारवायी करण्यासाठी गेले असता त्यााच्यावर जीवघेण हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने तीव्र निषेध नोंदवला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक येथे बैठक घेण्यात येऊन जोपर्यंत संबधितांना संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी महसुल विभागामार्फत करण्यात येणारी प्रतिबंधात्मक कार्यवाही पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २ फेब्रुवारी रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे की, वाळु माफियांकडून महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांवर सातत्याने अशा घटना घडत असतात याबाबत पथकाला सशस्त्र सुरक्षा रक्षक देण्याबाबत मागणी केली होती, मात्र या मागणीची कोणतीही दखल घेतली गेली नाही.

- Advertisement -

शासनाच्या गौणखनिज विषयक धोरणातील त्रुटींमुळे वाळु माफियांची मुजोरी वाढून महसुल अधिकारी व कर्मचार्‍यांवर होणार्‍या हल्ल्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, रचना पवार, डॉ. संदिप आहेर, पंकज पवार आदिंसह महसूल अधिकारी उपस्थित होते.

अनधिकृत रेती वाहतुक करणारे रेतीमाफिया यांच्याकडून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वारंवार जीवघेणे हल्ले होतात. सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. रेती माफियांची मुजोरी वाढत असून अधिकारी असुरक्षित आहेत. त्यामुळे या घटनेप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी.
शिवकुमार आवळकंठे , तहसीलदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -