घरमहाराष्ट्रनाशिकटेलिप्रॉम्पटरवर वाचून मोदींचे मराठीत भाषण

टेलिप्रॉम्पटरवर वाचून मोदींचे मराठीत भाषण

Subscribe

येथे जमलेल्या सर्व नाशिकवासियांना माझा नमस्कार! नाशिकच्या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो आहे. नाशिकचे नाव घेतले की मला संस्कृतीचे सात रंग दिसू लागतात...

येथे जमलेल्या सर्व नाशिकवासियांना माझा नमस्कार! नाशिकच्या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो आहे. नाशिकचे नाव घेतले की मला संस्कृतीचे सात रंग दिसू लागतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची ही सुरुवात. देशाच्या पंतप्रधानांना मराठी भाषा येते हे ऐकूण अनेकांना सुखद धक्का बसला. मात्र, भाषणस्थळावर ठेवण्यात आलेल्या टेलीप्रॉम्पटरमुळे मोदींना मराठीत बोलता आले हे लपून राहिले नाही. व्यासपीठावरील पोडीयमच्या दोन्ही बाजूने टेलीप्रॉम्पटर ठेवण्यात आले आहे. यात संपूर्ण भाषण वाचता येते. ते वाचून मोदी भाषण करतात. मात्र कॅमेरांमध्ये हे टेलीप्रॉम्पटर दिसू नये यासाठी छायाचित्रकारांना सभेपूर्वी सूचना देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी टेलीप्रॉम्पटर टाऊन मोदींची छबी टिपण्याचा प्रयत्न केला. मोदी संपूर्ण भाषण या टेलीप्रॉम्पटरमध्ये वाचूनच करत असल्याचे यावेळी दिसून आले.

- Advertisement -

पंतप्रधान मराठीत बोलताना पुढे म्हणाले की, या पुण्यभूमीचा पहिला रंग म्हणजे आदिमाया श्री सप्तश्रुंगी, दुसरा कुंभमेळा, तिसरा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, चौथा रंग म्हणजे भगवान श्रीराम आणि माता सीता, पाचवा रंग अंजनेरी येथील श्री हनुमानाचे जन्मस्थान, सहावा रंग म्हणजे भगूर येथील वीर सावरकरांची जन्मभूमी आणि सातवा रंग म्हणजे समतेच्या लढ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन… अशा विविध रंगांनी नटलेले हे तिर्थक्षेत्र आहे. मी आज नाशिकच्या या पावनभूमीत येऊन धन्य झालो!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -