घरमहाराष्ट्रनाशिकबहुचर्चित चट्ट्या बाप्प्या खून प्रकरणातील आरोपी निर्दोष

बहुचर्चित चट्ट्या बाप्प्या खून प्रकरणातील आरोपी निर्दोष

Subscribe

शहरात बहुचर्चित चट्ट्या बाप्प्या खून प्रकरणातील सर्व आठ संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा न्यायधीश ज्योती दरेकर यांनी हा निकाल दिला आहे.

शहरात बहुचर्चित चट्ट्या बाप्प्या खून प्रकरणातील सर्व आठ संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारी (दि. ७) जिल्हा न्यायधीश ज्योती दरेकर यांनी हा निकाल दिला. सबळ पुरावे असूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारसह इतर साक्षीदारांनी साक्ष फिरविल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचे या खटल्यातील जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी बोलताना सांगितले. चट्ट्या बाप्प्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गेल्या भोपा काठेवाडी याच्या फिर्यादीवरुन १६ जुलै २००७ रोजी आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास तत्कालीन एपीआय अशोक गणपत कोलते यांच्याकडे तपास होता.

उपचार सुरु असताना झाला मृत्यू

संशयितांनी चट्ट्या बापू सोनवणे व गेल्या भोपा काठेवाडी यांना १५ जुलै २००७ ला चर्चेसाठी शाहू महाराज हॉस्पिटल आवारात बोलावले होते. यानुसार कारने दोघे दवाखान्यात आले. त्यावेळी संशयित बसले होते. काही संशयित दुचाकीवरुन आले व त्यांनी हातातील तलवार, चॉपर, लाकडी दांडा, आसारी यांनी चट्ट्या बाप्यासह गेल्यावर वार केले होते. यात दोघे जखमी झाले होते. तीन दिवसांनी उपचार सुरु असताना चट्ट्या बाप्प्याचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

११ साक्षीदार फितूर

याप्रकरणी महेश चिंचोलकर, दिलीप बाबा भोसले, शंकर दिलीप भोसले, शंभू दिलीप भोसले, ललीत माधव कुंवर, शकील शेख अकबर शेख, राहूल शांताराम सोनवणे, सचिन उर्फ फावड्या अरुण पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारपक्षातर्फे २० साक्षीदार तपासले. त्यापैकी ११ साक्षीदार फितूर झाले. मंदिरातील नाग चोरणारा अटकेत बळीराम पेठेतील हनुमान मंदिरात रविवारी सकाळी महादेवाच्या पिंडावरील २ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या नागाची चोरी झाल्याची घटना घडली होती. सीसीटीव्ही फुटेज तपासून शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयिताला अटक केली आहे. सुरेश बाबुराव पवार (वय ६३ रा. शिवाजीनगर गल्ली नं ४ अमळनेर) असे संशयिताचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक एकनाथ पाडळे यांनी कर्मचार्‍यांना तपासाबाबत आदेश दिले. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रतन गीते, प्रितम पाटील, नवजीत चौधरी, गणेश ठाकूर यांच्या पथकाने तपास केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -