घरताज्या घडामोडीजिल्ह्यातील 300 शाळांची घंटा वाजली

जिल्ह्यातील 300 शाळांची घंटा वाजली

Subscribe

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत; नाशिक शहरासह तालुकास्तरावरील शाळा बंदच

नाशिक : कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमधील शाळा सुरु करण्याचे आदेश मिळताच गुरुवारी (दि.15) पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सुमारे 300 शाळांची घंटा वाजली. इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवण्यात येत असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. नाशिक महापालिका क्षेत्रासह तालुका स्तरावरील शाळा अजूनही बंद आहेत.
सिन्नर तालुक्यातील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयासह तालुक्यातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःच्या जबाबदारीवर इयत्ता आठवी, नववी दहावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी कमालिची उत्सुकता होती. पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात ग्रामपंचायत पाडळी, आशापूर येथील शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लोखंडे, सचिव प्रा. टी. एस ढोली, विश्वस्त अरुण भाऊ गरगटे यांनी संमती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी पुढाकार घेऊन सर्व पालकांची संमती घेऊन विद्यादानाचे काम सुरु केले. यासाठी पाडळी गावचे सरपंच सुरेखा रेवगडे, सुधीर रेवगडे, आशापुरचे सरपंच विष्णुपंत पाटोळे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला. यासाठी चंद्रभान रेवगडे, धनंजय रेवगडे, नाना पाटोळे, रघुनाथ पाटोळे, अशोक रेवगडे, तुकाराम रेवगडे, प्रल्हाद रेवगडे यांनी पुढाकार घेऊन विद्यालयातील सर्व शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी.बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह दिसून आला. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायरझरचा वापर करत विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यात आले. साधारणत: वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर शाळा सुरु झाल्या आणि मित्र, मैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून आला.

शिक्षण विभागाने ठोस निर्णय न घेता शाळा सुरू करण्याबाबत संदिग्ध वातावरण निर्माण केले. त्यामुळे शाळा सुरू करावी की करू नये, याबाबत मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक विद्यार्थी शाळा उघडण्यास इच्छूक आहे. शासन व शिक्षण विभाग ठोस निर्णय घेवून कोविड-१९ चे प्रतिबंधक उपायांची सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून शाळांना आदेश द्यावेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण त्वरीत करून घ्यावे.
-एस. बी. देशमुख,सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -