महामार्गावर ‘द बर्निंग डीजे व्हॅन’चा थरार

सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील घटना

the burning DJ van
द बर्निंग डीजे व्हॅन

सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावा जवळ बँड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना बागलाण येथील तरसाळी तालुक्यात घडली. या घटनेत गाडी व वाजविण्याचे  वाद्य तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने गाडीत बसलेल्या बँड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघात बँड मालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

या बाबत अधिक वृत्त असे कि, तरसाळी तालुका बागलाण येथील स्वर संगीत बँड पथकाची मिनी ट्रक क्र. एम. एच.१५ जि. ३६९७ हि आपल्या दहा ते पंधरा कलाकारांना घेऊन तालुक्यातील बिजोटे येथे लग्न समारंभात वाजविण्यासाठी जात असतांना ढोलबारे गावाच्या म्हसोबा मंदिरा जवळील वळण रस्त्यावर गाडीत अचानक अंतर्गत शॉर्टसर्किट होऊन आग लागली असता ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवित तातडीने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून सर्वांना खाली उतरण्याच्या सूचना केल्या. पथकातील कलाकारांनी तातडीने उद्या मारून जीव वाचविला.