घरमहाराष्ट्रनाशिकदरीत कार कोसळली; दोन जखमी

दरीत कार कोसळली; दोन जखमी

Subscribe

चंदनापुरी घाटातील घटना

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात कारवरील ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळली. रविवार (दि. २१) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने अपघातात चालकासह त्याचा जोडीदार किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील गलांडे व जोडीदार हे दोघे रविवारी दुपारी कारमधून संगमनेर येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने घारगावच्या दिशेने जात होते. चंदनापुरी घाटातील वळणावर आले असता त्याच वेळी सुनील यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गाच्या कडेला असलेले संरक्षक लोखंडी कठडे तोडून खोल दरीत जावून कोसळली. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, सुनील साळवे, मनिष शिंदे, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डै, भरत गांजवे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने खोल दरीतून कार बाहेर काढण्यात आली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका कार चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या कडेला असलेल्या दगडांवर जावून उलटली होती.

लागोपाठ दोन ते तीन दिवस सुट्या असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्याप्रमाणात कारची संख्या वाढली आहे तर काही जण अतीवेगाने वाहने चालवून वेगाची मर्यादा ओलांडतात. त्यामुळे वाहनांवर ताबा राहत नसल्याने हे अपघात होत आहे. वाहने चालवताना काही जण मोबाईलवरही बोलतात. त्यामुळे रस्त्याकडेही दुर्लक्ष होवून अपघात होत आहे.
                                                                 – भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, डोळासणे मदत केंद्र

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -