घरमहाराष्ट्रनाशिकटायर फुटल्याने कारची एसटीला धडक

टायर फुटल्याने कारची एसटीला धडक

Subscribe

अपघातात कारचालक ठार

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवल्याजवळ रायते शिवारात शनिवारी (दि. १९) सायंकाळी सहा वाजेच्या टायर फुटल्याने भरधाव कारने एसटीला धडक दिली. या अपघातात कारचालक ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले. कारचालक संजय नाना बारे (वय ३०, रा. आंबेवाडी, ता. निफाड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर योगेश बोरगुडे (वय ३५, रा. नैताळे) व राजेंद्र शिरसाठ (वय ४०,आंबेवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

पिंपळगाव बसवंत डेपोची बस औरंगाबादहून नाशिककडे जात होती.रायते शिवारात नाशिककडून येवल्याकडे भरधाव वेगाने कार (एमएच ०३-९२४३) जात होती. टायर फुटल्यामुळे कार विरुद्ध बाजूला आल्याने समोरून येणार्‍या एसटी बसला धडकली.

- Advertisement -

या अपघातात कारचालकाचा ठार झाला. कारमधील प्रवासी योगेश बोरगुडे व राजेंद्र शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील प्रवासी भाग्यश्री विकास बनबेहरे (रा. औरंगाबाद) व महादेव नंदू जंगम (रा. ओझर, ता. निफाड) हे किरकोळ जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -