घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग शिक्षक,कर्मचार्‍यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार

दिव्यांग शिक्षक,कर्मचार्‍यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार

Subscribe

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दिव्यांग शिक्षकांसह सर्वच कर्मचार्‍यांच्या पत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

नाशिक जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत सुमारे 1500 दिव्यांग शिक्षक कार्यरत आहेत. दिव्यांगांना 21 विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या विविध विभागांमध्ये साधारणत: अडीच हजार दिव्यांग कर्मचारी आहेत. या सर्वांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करुन घेण्याचे आदेश सीईओ बनसोड यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या विविध विभागांमध्ये साधारणत: हजाराहून अधिक दिव्यांग कर्मचारी असून त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत. प्रामुख्याने कर्मचारी बदल्यांच्या दरम्यान कर्मचारी वर्गाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून दिव्यांग दाखविले जाण्याचे प्रकार होतात. यात सोईच्या बदल्या करून घेतल्या जात असल्याचे अनेकदा दिसून आलेले आहे. त्यामुळे सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करुन घेण्याचे आदेश सीईओ बनसोड यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. या आदेशामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल करून लाभ घेतलेले कर्मचारी समोर येणार आहे.

- Advertisement -
कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले

जिल्हा परिषदेत आता कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. बदली प्रक्रियेत प्राधान्य मिळावे म्हणून काही कर्मचायांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. आता या प्रमाणपत्रांचीच पडताळणी होणार असल्याने कर्मचार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -