घरमहाराष्ट्रनाशिकसहा महिन्यांपासून बंधार्‍याचे दरवाजे खुलेच

सहा महिन्यांपासून बंधार्‍याचे दरवाजे खुलेच

Subscribe

एकलहरे बंधार्‍याचे दोन्ही दरवाजे नादुरुस्त

ज्ञानेश्वर क्षीरसागर, एकलहरे : वीजनिर्मिती केंद्राचे बंधार्‍याचे दरवाजे गेल्या ६ महिन्यांपासून नादुरुस्त असूनदेखील, महानिर्मिती केंद्र प्रशासनाला दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडलेला नाही. एकलहरे येथील वीजनिर्मिती केंद्रासाठी ३५ वर्षांपूर्वी एकलहरे, ओढा, शिलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी गोदावरी नदीवर बंधारा करण्यात आलेला आहे. वीजनिर्मितीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी गंगापूर धरणातून पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करावी लागते. एकलहरे वीज केंद्रासाठी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्राची स्थापना झाली तेव्हा पाच संच होते. त्यामुळे पाण्याची आवश्यकता अधिक होती.

आजमितीस केवळ दोन संचांतून वीजनिर्मिती होत असल्याने पाण्याची मागणी घटली आहे. गोदावरी नदीतील प्रदूषण पातळीत काही वर्षांपासून वाढ झाल्याने पाण्याच्या शुद्धीकरणासाठी अधिक प्रमाणात खर्च होतो.एकलहरे बंधार्‍याचे दोन दरवाजे असून ते स्वयंचलित आहेत. प्रथमच या बंधार्‍यासाठी हायड्रोलिक दरवाजाचा प्रयोग करण्यात आला. या बंधार्‍याचे दरवाजे उघडण्यासाठी दरवाजाच्या फुगीर भागात वीजपंपाच्या साहाय्याने पाणी भरले जाते. तर बंद होण्यासाठी पाणी काढले जाते. मात्र, ६ महिन्यांपूर्वी उघडलेले दरवाजे आजही बंद होण्याचे नाव घेत नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे वीज प्रशासनाची काळजी वाढली आहे. बंधार्‍यात पाण्याचा साठा अत्यल्प असून आवश्यकतेनुसार वीजनिर्मिती केंद्राला पुरवठा होत आहे. मात्र, भविष्यकालीन निर्मितीसाठी बंधार्‍याचे दरवाजे पुन्हा पहिल्यासारखे पूर्ववत होणे आवश्यक आहे. दरवाजाच्या तळाशी गाळ जमा झाल्याने हे दरवाजे नादुरुस्त झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार दुरुस्तीसाठी १ कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, पूर्वीसारखी केंद्राची आर्थिक स्थिती नसल्याने दुरुस्तीसाठी चालढकल केली जात आहे.दरवाजे उघडलेले असल्याने पाणी प्रवाहित होत आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी कमी झाली आहे. तसेच, पानवेलीनिर्मिती थांबली आहे. परिणामी डासांची उत्पत्ती थांबून परिसरातून गावांमधील डासांचा त्रासही कमी झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -