Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक महापालिकेची बनावट वेबसाईट

महापालिकेची बनावट वेबसाईट

३० हजारांना गंडा

Related Story

- Advertisement -

महापालिकेची बनावट वेबसाईट तयार करत सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका व्यक्तीला ३० हजारांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२४) उघडकीस आली. यासंदर्भात पोलिसांसह महापालिकेकडे ही संबंधित व्यक्तीने तक्रार केली आहे.

दिंडोरी रोडवरील रहिवाशी योगेश पाटील यांनी अपार्टमेंटसमोरील ड्रेनेजच्या चेंबरसंदर्भात एनएमसी ग्रिव्हन्स नावाच्या (https://www.complaintboard.in/complaints-reviews/nashik-nmc-l569924.html) वेबसाईटवर तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना 9707757355 या मोबाईलवरुन कॉल आला. हा कॉल कस्टमर केअर हेल्पलाईनचा असल्याचे भासवत पुढील ७२ तासांत तक्रार निवारण केले जाईल, असे फोनवर बोलणार्‍या भामट्याने पाटील यांना सांगितले. तसेच, केवळ २० रुपये शुल्क भरण्यासाठी एक लिंकही दिली. मात्र, हे करत असताना प्रत्यक्षात मात्र २९ हजार ७७८ रुपये काढून घेण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिसांत धाव घेतली. तेव्हा त्यांना गूगलवर शोधलेली ही वेबसाईट बनावट असल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

पोलिसांनी ही वेबसाईट तातडीने ब्लॉक करावी, अशी मागणीही पाटील यांनी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून नाशिककरांना असे बनावट कॉल्स येण्याची संख्या प्रचंड वाढली असून, नागरिकांनी कुणालाही आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी देऊ नये, तसेच एखादी लिंक ओपन करताना किंवा गूगलवर सर्च केल्यानंतरही ती लिंक अधिकृत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हतबलता दर्शवत पोलिसांची डोळेझाक

कधी बँक, तर कधी लकी ड्रॉच्या नावाने सामान्यांना गंडा घालणार्‍यांनी आता सीमकार्ड अपडेटच्या नावाने नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. या प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाली असतानाही पोलिस मात्र हतबलता दाखवत याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. झारखंडसह उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील टोळ्या यामागे कार्यरत असल्याचे सातत्याने पुढे येऊनही त्यांचा बंदोबस्त मात्र पोलिसांना करता आलेला नाही.

Yogesh Patilनागरी समस्येसंदर्भात तक्रार केल्यानंतर मला कॉल आला आणि नाममात्र शुल्क देण्याचं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात मात्र मोठी रक्तम कपात झाली.
– योगेश शांताराम पाटील

- Advertisement -