घरक्राइमप्रसाद परत खाल्ल्याने वडील रागावले; मुलीची आत्महत्या

प्रसाद परत खाल्ल्याने वडील रागावले; मुलीची आत्महत्या

Subscribe

वडिलांनी १४ वर्षांच्या मुलीला प्रसाद कमी खा, असे रागावल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रद्धा दिलीप कापरे (रा. संभाजीनगर, सातभाई संकुलच्या पाठीमागे, दसक, जेलरोड) असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील दिलीप कापरे यांनी त्र्यंबकेश्वर येथून प्रसाद आणला होता. तो प्रसाद सर्वजण खात असताना श्रद्धाने तो परत खाल्ला. ही बाब वडिलांच्या लक्षात आली. ते तिच्यावर रागावले. त्यातूनच तिने घरी असताना विष प्राशन केले. ती विष पिल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -