घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात

तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात

Subscribe

इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक

नाशिक शहरातील एम. जी. रोडकडून धुमाळ पॉइंटकडे जाणार्‍या रेडक्रॉस सिग्नलजवळील जाधव व्यापारी संकुलातील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटर शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला गुरुवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजेदरम्यान भीषण आग लागली. सुदैवाने आगीत जीवीतहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. सुमारे दोन तासांनंतर शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या २० जवानांनी नऊ बंबांच्या सहाय्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

शहरातील एमजीरोडवरील रेडक्रॉस सिग्नलकडून धुमाळ पॉइंट-दहीपुलाकडे जाणारा रस्ता मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे राहुल ट्रेडर्सच्या जवळीला डीपीला शॉर्टसर्किट आगा लागली. विजेचा दाब वाढल्याने राहुल ट्रेडर्समधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने दुकानातील कामगारांची पळापळ सुरु झाली. आगीची माहिती सीमा भंडारी यांनी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटाला अग्नीशमन दलाच्या मुख्यालयात दिली. माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथून एका बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. आग मोठया प्रमाणात असल्याने पंचवटी उपकेंद्रावरुन दोन बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या तीन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर मुख्यालयातून तीन आणि सिडको, सातपूर, कोणार्कनगर केंद्रावरुन प्रत्येकी एक असे सहा बंब एकापाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले. २० जवानांनी दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख अर्जुन कुर्‍हाडे, साहील मोरे, मयुर एंडाईत यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -