घरमहाराष्ट्रनाशिकविमान उड्डाणाला अखेर जुलैचा मुहूर्त

विमान उड्डाणाला अखेर जुलैचा मुहूर्त

Subscribe

पुणे-बेळगाव, दिल्ली-अहमदाबाद सेवा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून विमानसेवेला लागलेली घरघर लवकर संपण्याची चिन्हे आहेत. दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक विमान कंपन्यांनी आपली नाशिकमधून देण्यात आलेली सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात अलायन्स एअरने आघाडी घेत १२ जुलैपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक-अहमदाबाद-दिल्ली ही हॉपिंग फ्लाईट अलायन्स एअरकडून सुरू केली जाणार असून, त्यासोबतच नाशिक-पुणे-बेळगाव विमानसेवेचा पर्याय नाशिककरांना यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. सध्या नाशिकसह अनेक शहरांमध्ये आजही वीकेण्ड लॉकडाऊन सुरू असल्याने शनिवार आणि रविवार मात्र कोणतीही सेवा उपलब्ध नसेल.

- Advertisement -

धार्मिक आणि औद्योगिकदृष्ठ्या ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. त्यातून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच विमानसेवा अनियमित राहिली आहे, त्यामुळे तातडीची गरज असतानाही अपेक्षित शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध झाली नाही. मात्र, आता सर्व व्यवहार सुरळीत होत असताना हवाईसेवेची गरजही वाढली आहे. त्यादृष्टीने एअर अलायन्सची सेवादेखील महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -