Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र ममदापूरच्या अरण्यात विविध वन्यप्राण्यांचा अधिवास; पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात झाली गणना

ममदापूरच्या अरण्यात विविध वन्यप्राण्यांचा अधिवास; पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात झाली गणना

Subscribe

नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वनविभागाने ठिकठिकाणी बौद्धपौर्णिमेनिमित्त कॅमेरे व पाच पाणवठ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. वन्यप्राण्यांची गणना ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांचा संचार पाहिला. नाशिक पूर्वचे उमेश वावरे व सहायक वनरक्षक मनमाड सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्राणीगणना करण्यात आली.

- Advertisement -

भूलेगाव, राहडी, ममदापूर, पिंपळखुटे बुद्रुक, राजापूर, सोमठाणजोश, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, कुसमाडी, राखीव वनातील पाणवठ्यावर कॅमेरे बसवले आहेत. मचानवर थांबून पुरवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणार्‍या वन्यजीवांची गणना करण्यात आली. बुद्धपौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यातील उन्हाच्या तीव्र झळांमुळे रात्रीच्या सुमारास पाणवठ्यावर प्राणी येतात. त्यामुळे त्यांची गणना करण्यासाठी ही अत्यंत उत्तम संधी मानली जाते. यात अनेकांचा समावेश असतो.

- Advertisement -

या हेतूने प्राणीगणना करण्यात आली. यावेळी तरस, लांडगे, काळवीट, खोकड, घुबड, मोर, मुंगूस, उदमांजर इतर वन्यजीवांची नोंद घेण्यात आली आहे. यासाठी जंगलात वनपाल माळी (ममदापूर), वनरक्षक गोपाल हरगावकर, गोपाल राठोड (वनरक्षक, राजापूर), पंकज नागपुरे यांनी विशेष लक्ष देत वनसेवक रामनाथ भोरकडे, आप्पा वाघ, मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे आदींसह वन कर्मचार्‍यांनी नियोजन केले.

- Advertisment -