घरमहाराष्ट्रनाशिकआगीची आज दिवसभरातील चौथी घटना ; पिंपळगावी ट्रकला आग

आगीची आज दिवसभरातील चौथी घटना ; पिंपळगावी ट्रकला आग

Subscribe

दिवसभर जिल्ह्यात आगींचे सत्र सुरूच

पिंपळगाव बसवंत :  धुळ्याहून नाशिकला निघालेल्या ट्रकला आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कांदा मार्केटनजीक घडली. ट्रकमध्ये पेपर रोल असल्याने काही क्षणात ट्रक आगीत भस्मसात झाला.पेपर रोल घेऊन निघालेला हा ट्रक पेट्रोल पंपाशेजारी थांबला होता. यावेळी ट्रकचालक काही कामानिमित्त बाजूला जाताच या ट्रकने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाले.

आज सकाळी नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. बसला लागलेली आग भीषण असल्याने 11 जणांचा जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्याचप्रमाणे सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती. परंतु अचानक बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मनमाडनजीक सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते. सिलेंडरचे स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे किलोमीटर अंतरावर रोखून ठेवण्यात आली होती.ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे आगीवर नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला अडथळ्याचा सामना करावा लागला.एकंदरीत आज दिवसभर जिल्ह्यात आगींचे सत्र सुरूच होते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -