घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रेमासाठी कायपण, नाव बदलून राहिले तरीही पोलिसांना सापडले

प्रेमासाठी कायपण, नाव बदलून राहिले तरीही पोलिसांना सापडले

Subscribe

मध्यप्रदेशचे प्रेमीयुगुल ताब्यात

मध्यप्रदेशमधून पळून आलेले व नाशिक शहरात नावे बदलून राहणार्‍यास प्रेमीयुगुलास नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना शहर पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने पालकांच्या ताब्यात सुखरुप दिले. नीरज कमल केवट (वय २१) आणि पूजा गोविंद सिसोदिया अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह पथकाला परप्रांतीय हिंदी भाषिक जोडपे संशयितरित्या नाशिकरोडवरील एका लॉजमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने लॉजमध्ये संशयितांची चौकशी केली. पोलिसांना तरुणाने नाव नीरज केवट असे सांगितले. घरच्यांना न सांगता पूजा गोविंद सिसोदियासोबत पळून आलो आहे, अशी माहिती त्याने दिली. विशेष म्हणजे, दोघेही नाव बदलून राहत असल्याचे समोर आले. दोघेही मोबाईल वापर करत नसल्याने मध्यप्रदेश पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या.

- Advertisement -

मुलगा बडवानी येथून तर मुलगी बिछदोड (ता. घटिया, मध्यप्रदेश) येथून मिसिंग असल्याची नोंद मध्यप्रदेश पोलिसांकडे होती. पथकाने बडवानी पोलीस ठाण्याच्या अंमलदाराशी संपर्क साधून मोबाईलवरून दोघांचे फोटो पाठवत खात्री केली. तरुणी खरगोन पोलीस ठाण्यात मिसिंग असल्याचे समजले. खरगोन पोलीस ठाण्याच्या लीला वास्कले, संजय यादव यांनी नाशिकमध्ये येत या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सुनील भालेराव, शामकांत पाटील, रेखा गायकवाड यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -