जमिनीच्या हिस्स्यासाठी टोळक्याची महिलेला मारहाण

लोखंडी पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना

नाशिक : जमिनीच्या हिस्स्यावरुन टोळक्याने ५५ वर्षीय महिलेला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी छबाबाई साबळे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मतेवाडी शिंदेगाव येथील संशयित सुनील तानाजी साबळे, योगेश नवाळे, योगेश कुटे, सागर उगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमताने जमिनीच्या हिस्स्यावरुन साबळे यांना लोखंदी पाईपच्या तुकड्याने मारहाण व शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक काकड करत आहेत.

दूध बाजारातून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना दूध बाजार, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी योगेश शंकर आंधळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश आंधळे यांनी दुचाकी दूध बाजार परिसरात पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी लंपास झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार भोई करत आहेत.