Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक 'स्मार्ट सिटी'च्या सायकलची टवाळखोरांकडून तोडफोड

‘स्मार्ट सिटी’च्या सायकलची टवाळखोरांकडून तोडफोड

Subscribe

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नाशिककरांसाठी सायकल शेअरिंग उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सायकलची टवाळखोरांनी तोडफोड केल्याची घटना पुढे आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नाशिककरांसाठी सायकल शेअरिंग उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सायकलची टवाळखोरांनी तोडफोड केल्याची घटना पुढे आली आहे. भद्रकाली परिसरातील पंचशील नगरात ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सायकलिंगला प्रोत्साहन मिळावे, त्यातूनच आरोग्य संवर्धन व्हावे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला इको-फ्रेंडली पर्याय असावा, या हेतूने नाशिकमध्ये ठिकठिकाणी सायकल स्टँड्स तयार करण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते सकाळी व्यायामाच्या हेतूने या सायकल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, तोडफोडीच्या घटनेमुळे या उपक्रमाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पंचशील नगरात गेल्या आठवड्यात दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी सायकलची मोडतोड केल्याची आढळल्यानंतर या उपक्रमाचे सचिन मोरे यांनी भद्रकाली पोलिसांत तक्रार केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -