घरमहाराष्ट्रनाशिकइंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूची हिरवळ नष्ट होणार; रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली १८० झाडांवर...

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूची हिरवळ नष्ट होणार; रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली १८० झाडांवर कुऱ्हाड

Subscribe

नाशिक : वडाळागांव ते इंदिरानगर दरम्यान करण्यात येणार्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात साधारणपणे १८०छोट्या मोठ्या झाडांची कत्तल होणार आहे पिंपळ,वड,औदुंबर ,बेल आदी जातीच्या वृक्षांची तोड करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश नसतांनाही न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणा-या पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शहरातील वृक्षप्रेमींनी इंदिरा नगर बोगद्या नजीक हातात फलक घेऊन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत पालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरणाचा निषेध केला

इंदिरानगर परिसरातील वडाळागांव ते इंदिरानगर बोगदा या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरवात केली आहे त्याअगोदर पालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या कामात साधारणपणे १८०वृक्ष अडथळे बनु पहात असुन या वृक्षांची तोड करण्याच येणार असून याबाबत नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या यावेळी अनेक वृक्ष प्रेमीसह वृक्ष बचाव संघटनांनी हरकत नोंदविल्या आहे मात्र तरी देखील पालिका प्रशासन केवळ ठेकेदाराच्या हितासाठी याभागात उभी असलेली सुमारे १८०वृक्षांची तोड करण्याच्या तयारीत आहे

- Advertisement -

वास्तविक पाहता पिंपळ, वड, औदुंबर, बेल यासाठी राष्ट्रीय दर्जा प्राप्त वृक्षांची तोड करण्यात येऊ जर रस्त्याच्या कामात एखादे झाड येत असेल तर ते न तोडता रस्ता अन्य मार्गाने वळविण्याचे तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षजावळ वाहतुक बेट तयार करुन ही झाडे वाचविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असतांनाही पालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरण न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याने न्यायालयाचा आदेश झुगारून केवळ ठेकेदाराच्या हिताखातीर काम करणार्‍या मनपा प्रशासनाचा वृक्ष प्रेमींनी इंदिरानगर बोगदा तसेच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ हातात निषेधाचे फलक घेऊन निषेध केला यावेळी शहरातील जगबिरसिंग कौर, भारती जाधव ,संदिप भानोसे, संतोष रेवगडे, अजिंक्य तरटे, योगेश वाघ मनिष बाविस्कर, प्रबोधिनी चव्हाण, हेमंत नागपुरे,योगेश बर्वे, कुलदीप कौर, अरविंद निकुंभ आदींसह विविध वृक्षप्रेमी संघटनांचे पदाधिकारी तसेच वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -