भरधाव वाहनाच्या धडकेत हेल्मेटचा बेल्ट तुटला; दुचाकीचालक ठार

kargil to srinagar zojila pass road accident tavera vehicle fell 500 feet in zojila ditch 8 people feared dead
कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

नाशिक शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. भरधाव वाहनाने दुचाकीचालकाला दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, भरधाव वाहनाच्या धडकेत हेल्मेटचे बेल्ट तुटले आणि दुचाकीचालकाच्या डोक्यास मार लागला. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१४) मध्यरात्री १.४५ वाजता दिंडोरी रोडवरील म्हसरुळगावात घडली. अक्षय नंदू बस्ते (वय २०, रा. शिदवंड, ता. दिंडोरी, जि.नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय बस्ते हा दुचाकी(एमएच १५-इके ३८१७)वरुन दिंडोरी रोडवरील म्हसरूळगाव चौकातून जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्याअज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अक्षय बस्तेच्या हेल्मेटचा बेल्ट तुटले. हेल्मेट बाजूला पडल्याने अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानाही अज्ञात वाहनचालक मदतीला धावून आला नाही. त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी लक्ष्मण श्रीराम शिंदे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.