घरमहाराष्ट्रनाशिकत्या महिलांना मोफत बियाणे देण्याचा विचार

त्या महिलांना मोफत बियाणे देण्याचा विचार

Subscribe

नीलम गोऱ्हे यांनी केली कोरोना विधवा बाबत घोषणा

नाशिक : कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या महिलांना मोफत बियाणे देण्याचा विचार केला जात आहे. त्यासंदर्भात राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून बियाणे विक्रेत्यांना आवाहन करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोव्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असलेल्या डॉ. नीलम गो-हे यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यानंतर धार्मिक संस्था व पुरातत्त्व विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या धर्तिवर त्र्यंबकेश्वर सारख्या मंदिरांचा विकास करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे आवाहन केल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले ज्या आधाराश्रमात राहतात त्या ठिकाणीही डॉ.गोव्हे यांनी भेट दिली. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला आहे असे बालक आणि शेतकरी आत्महत्या केलेल्या बालकांना या आश्रमशाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात शासन निर्णय असल्याची आठवण त्यांनी करुन दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांचे १०५ प्रस्ताव शासनाने फेटाळले आहेत. हे अहवाल का फेटाळले, याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनीअधिकाऱ्यांना दिल्या. शनिवारी त्या चांदवड येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -