Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक 15 वर्षापासून शाही मिरवणूक मार्गावरील वीज तारांचा प्रश्न 'लटकलेलाच'

15 वर्षापासून शाही मिरवणूक मार्गावरील वीज तारांचा प्रश्न ‘लटकलेलाच’

Subscribe

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच या मार्गावरील उघड्या वीज तारा तातडीने काढण्यात याव्या यासह विविध उपाययोजनां संदर्भात गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका, पोलीस प्रशासनाची चर्चा केली.

भक्तांच्या लाडक्या गणरायाला २८ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाकडून यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत शेकडो मोठी मंडळे सहभागी होतात. या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने हजर असतात. वाकडी बारव ते दूधबाजार, भद्रकाली मार्केट, मेनरोड, महाबळ चौक, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजामार्गे गौरी पटांगण या मार्गाने विसर्जन मिरवणूक काढली जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिका अधिकारी तसेच शहर पोलिसांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

- Advertisement -

या दौर्‍यात परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, महापालिका, स्मार्ट सिटी, महावितरण तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी तसेच गणेश मंडळांच्यावतीने समीर शेटे, विनायक पांडे, गणेश बर्वे, राजेंद्र बागुल, रामसिंग बावरी, सत्यम खंडाळे, पोपट नागपुरे, बबलू परदेशी आदी उपस्थित होते. पाहणीदरम्यान काही ठिकाणी अडथळे दिसून आले. ते दूर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. भाविकांची आणि मंडळ कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान सर्व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त किती असावा, याचे नियोजन करण्यात आले.

या उपाययोजनांबाबत सूचना

  • मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करावा
  • या मार्गावर अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असून त्या हटवाव्यात
  • मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे.
  • मिरवणूक रथांना अडथळे ठरणारे मेहेर चौकातील सिग्नलचे खांब उभे करावे
  • अनेक विद्युत खांब हे विनाकारण उभे करण्यात आले असून ते हटवावेत
  • मिरवणूक मार्गावर महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था करावी.
  • मालेगाव स्टँडवरील दिशादर्शक फलक हटविण्यात यावे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -