घरमहाराष्ट्रनाशिकभऊरला घराच्या छतावर निघाला किंग कोब्रा

भऊरला घराच्या छतावर निघाला किंग कोब्रा

Subscribe

तीन तासांच्या प्रयत्नानंतर नागास पकडण्यात सर्पमित्राला यश

भऊर येथील नेपाळी वस्तीजवळ राहत्या घराच्या छतावर किंग कोब्रा नाग आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली असून चांदवड येथील सर्प मित्राला तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर नागास पकडण्यात यश आले.याबाबत सविस्तर माहिती अशी, भऊर येथील नेपाळी वस्तीजवळील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेतकरी प्रवीण बापू पवार यांच्या राहत्या घराच्या छतावर सायंकाळच्या सुमारास प्रवीण पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांनी प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर त्यांनी शेजारील नागरिकांना बोलावून छतावरील नाग दाखवला.

पूनम पवार यांचे पती प्रवीण पवार कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी समोरील भयावह दृश्य पाहून घाबरल्या होत्या, शेजारच्या नागरिकांनी हा सर्व प्रकार बघितल्यानंतर सर्वच भयभीत झाले होते. साधारण पाच ते सहा फूट लांबीचा नाग असल्याचे सांगितले जात होते. याबाबत येथील आबाजी पवार यांनी चांदवड येथील सर्प मित्रांसोबत संपर्क साधला असून सर्प मित्र संदीप बडे व त्यांचे सहकारी मुन्ना सय्यद यांनी धाव घेत साधारण तीन ते चार तास रेस्क्यू करून या किंग कोबरा विषारी सापाला पकडण्यास त्यांना यश आले आहे.

- Advertisement -

सर्प मित्रांनी चांदवड वनविभागाला याबाबत माहिती दिली असून सुरक्षित ठिकाणी जंगालात या किंग कोब्रा सापाला सोडण्यात येणार आहे. यावेळी बाबाजी पवार, राजू गरुड, शरद गरुड, आबा पवार, सचिन पवार, रुपेश महाजन, विकी पवार, विकी रौंदळ, राजू चव्हाण आदिंनी सहकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -