घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा बँकेसह बाजार समित्यांचा वाजणार बिगूल

जिल्हा बँकेसह बाजार समित्यांचा वाजणार बिगूल

Subscribe

सहकारी संस्थाच्या निवडणूका घेण्याचे आदेश

कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या स्थितीपासून सुरु करण्याचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.2) दिले आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह कृषी उत्पन्न बाजार समित्या व सहकारी संस्थांचा लवकरच बिगूल वाजणार आहे.

शासन आदेशामुळे नाशिक जिल्ह्यातील १ हजार ८८२ सहकारी संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: मार्च महिन्यात जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यक्रम घोषीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे राज्य शासनाने होवू घातलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्च २०२० रोजी पहिली मुदतवाढ दिली. यानंतर सलग दोन वेळा तीन-तीन महिन्यांची मुदतवाढ देणारे आदेश राज्य शासनाने काढले होते. तिसर्‍या मुदतवाढीची मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील ४५ हजार संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील देत, ज्या संस्थांच्या निवडणुका मागील वर्षी ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या होत्या, तेथून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रक्रिया देखील सुरू झाली होती. जिल्हयातील अशा पहिल्या टप्प्यातील ३३ संस्थांच्या निवडणुकांचा आराखडाही जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -