घर महाराष्ट्र नाशिक राख्यांनी सजली बाजारपेठ, भाऊरायासाठी राखी घ्यायला बहिणींची लगबग

राख्यांनी सजली बाजारपेठ, भाऊरायासाठी राखी घ्यायला बहिणींची लगबग

Subscribe

नाशिक : बहीण भावाचे अतूट नाते अधिक वृध्दींगत करणारा सण म्हणजे राखी पोर्णिमा बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये महिला वर्गाची राखी खरेदी करण्याकरीता गर्दी दिसून आली. विविध रेशमी धाग्यांनी, मणी, खडे यांनी सजलेल्या राख्या दुकानांच्या दारात, फुटपाथवरच्या स्टँडवर दिमाखाने डोलतांना दिसून आल्या. या राख्या खरेदी करण्यासोबतच या राख्यांची विविधता पाहण्याचा आनंद घेण्यासाठीही दुकानांसमोर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

शहरातील मुख्य बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, नारंगी अशा भडक रंगाच्या राख्यांना अधिक मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन राख्या बाजारात उपलब्ध आहेत. नेहमीच्या गुंडा राखीसह रंगीबेरंगी राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून आहेत. कलकत्ता राखी, चंदन राखी, डायमंड राखी, मोती राखी, कुंदन राखी, डिझाईन ओम राखी, स्वास्तिक राखी, श्री राखी, मोर राखी, चांदी राखी, कलर स्टोन राखी, पारंपारिक पद्धतीच्या गोंडा राखी, दोरी राखी, मारवाडी राखी, कुंदन, मन्याची राखी, कार्टुन राखी अशा प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. शहरतील बाजारात १० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत तर ८० रुपयांपर्यंत ८०० रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. राखी पोर्णिमेच्या खरेदीसाठी शहरातील मेनरोड परिसरात मोठया प्रमाणावर गर्दी दिसून आली तसेच उपनगरांमध्येही विक्रेत्यांनी हॉलमध्ये राखीचे स्टॉल्स लावले आहेत.

बहिणींसाठी दागिनेही

- Advertisement -

बहिणीही बहिणींना बांधण्यासाठी या खास बनवलेल्या राख्या विकत घेताना दिसत आहेत. त्यामुळे या राख्यांना दागिन्यांचे रूपही मिळालेले आहे. चांदीची ब्रेसलेट, सोन्याची ब्रेसलेट, कृत्रिम दागिन्यांमध्ये उपलब्ध होणारी ब्रेसलेट यांची खरेदीही राखीपौर्णिमेच्या निमित्ताने केली जात आहे.

लहान मुलांसाठी कार्टून राखी

चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -