घरक्राइमपाथर्डी फाट्यावर उभे राहिल्याने टोळक्याचा एकावर जीवघेणा हल्ला

पाथर्डी फाट्यावर उभे राहिल्याने टोळक्याचा एकावर जीवघेणा हल्ला

Subscribe

नाशिक शहरातील पाथर्डी फाट्यावर वाहनाची वाट पाहत उभे राहिलेल्या एकास तिघांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करत जखमी केल्याची घटना पाथर्डी फाटा, म्हसोबा मंदिरासमोर, उड्डाण पुलाखाली, नाशिक येथे घडली. याप्रकरणी बिट्टू सुनील झा यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित डाबर्‍या ऊर्फ राहुल जाधव, किसन, शंतून राक्षे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनसार, बिट्टू झा पाथर्डी फाटयावर ट्रान्सपोर्टच्या वाहनाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी संशयित तिघेजण त्यांच्याजवळ आले. तुम्ही येथे का थांबले, तुम्हाला माहिती नाही का, आम्ही येथे काय करत आहे. तुम्ही येथून निघून जा, असे तिघांनी त्यांना सांगितले. झा यांनी वाहनाची वाट पाहत असून, थोड्यावेळाने निघून जातो, असे तिघांना सांगितले. राग अनावर झाल्याने तिघांनी झा यांचा मित्र अक्षय गांगुर्डे यास शिवीगाळ व मारहाण केली. झा यांनी मध्यस्थी होत भांडण सोडवून दोघेजण एमआयडीसी, अंबड येथे आले. या ठिकाणीसुद्धा तिघे संशयित आले. त्यांनी अक्षय गांगुर्डेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. संशयितांनी त्यांना तुमचा गेम करुन टाकीन, अशी धमकी देत निघून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -