जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाचा खून; तरुणाला जन्मठेप

नाशिक : जादूटोणा केल्याच्या संशयातून आणि विहिरीसाठी जागा न दिल्याने वयोवृद्धाचा कुर्‍डाडीने वर्मी घाव करुन खून करणार्‍या तरुणास जिल्हा न्यायाधीश मा. बी. व्ही.वाघ यांनी मंगळवारी (दि.२१) जन्मठेप व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा ठोठावली ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता दिंडोरी तालुक्यातील तिल्होळी गावचे शिवारात घडली होती. भास्कर रमेश बुरंगे (वय २४, रा. तिल्होळी, ता. दिंडोरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्रंबक आबाजी टोंगारे (वय ७२, रा. तिल्होळी, ता. दिंडोरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

त्रंबक टोंगारे हे टोंगारे हे जादूटोणा करतो, त्यामुळे माझी तब्येत बरोबर राहत नाही आणि विहीर खोदण्यासाठी शेतातील जागा दिली नाही म्हणून गैरसमज व राग मनात ठेवला. टोंगारे हे बैलजोडी घेऊन शेताकडे जात होते. त्यावेळी आरोपी भास्कर बुरंगे याने टोंगारे यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार ठार केले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी तपास केला. त्यांनी आरोपीविरूध्द भक्कम पुरावे गोळा करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपविरुध्द गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीतास जन्मठेप व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना चव्हाण, पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दुकळे यांनी कामकाज पाहिले.