घरताज्या घडामोडीआमदार खोसकरांच्या चुलत चुलत्याचा खून

आमदार खोसकरांच्या चुलत चुलत्याचा खून

Subscribe

सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगरामागे वासळी रोड परिसरात शुक्रवारी (दि.३१) रात्री मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. प्रभाकर खोसकर (65, रा.नाईकवाडी) असे मृताचे नाव आहे. ते आमदार हिरामण खोसकर यांचे चुलत चुलते आहेत. त्यांचा खून झाल्याचा संशय असून त्यांच्या हत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध सुरू केला आहे.

प्रभाकर खोसकर २१ जानेवारीपासून बेपत्ता होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शुक्रवारी रात्री सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना फाशीच्या डोंगरामागे वृद्ध मृतावस्थेत आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रांकेश हांडे व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, नाशिक तालुका पोलीस ठाण्यात वृद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याचे पोलिसांना समजले. मृताचे छायाचित्र मिळतेजुळते असल्याचे दिसताच सातपूर पोलिसांनी नाईकवाडी गावात चौकशी केली. पोलिसांनी तीनजणांना ताब्यात घेतले आहे. खोसकर यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात येऊन खून करण्यात आला असावा, असे पोलिसांनी सांगितले. मृत प्रभाकर खोसकर हे व्यसनाच्या आहारी गेले होते, असे बोलले जात असून त्यांची हत्या नेमकी कोणी व का केली, याचा तपास लागलेला नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -