Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला

पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला

पहिल्याच आठवड्यात ८०१ मिमी पाऊस

Related Story

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. १ जून ते ८ जून दरम्यान जिल्ह्यात ८०१.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जून महिन्याच्या सरासरीच्या ३० टक्के पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, शहरात १ जूनपासून नियमितपणे पर्जन्यराजा बरसत आहे.

हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. साधारणपणे ७ जूननंतर मान्सून हजेरी लावत असतो. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली. जून महिन्यात सरासरी २७०४.८० मिलीमीटर पाऊस पडतो. १ जून ते ८ जून दरम्यान ८०१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात जून महिन्यात सरासरी ४९५.७० मिलीमीटर पाऊस पडतो आतापर्यंत तालुक्यात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पेठ तालुक्यात ८१.६ मिलीमीटर पाऊस झाला. तालुक्यात २९३.४२ मिलीमीटर पाऊस पडतो. सुरगाणा तालुक्यात १८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात २७०.८६ मिलीमीटर पाऊस होत असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सर्वच्या सर्व १५ तालुक्यांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे.गतवर्षी याच दरम्यान १४२५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सरासरीच्या ९५.५ टक्के पाऊस नोंदविण्यात आला होता.

- Advertisement -