Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणारा कर्जाचे पैसे न देता महिलेचीच दुचाकी घेऊन...

लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणारा कर्जाचे पैसे न देता महिलेचीच दुचाकी घेऊन फरार

Related Story

- Advertisement -

लग्नाचे आमिष दाखवून एकाने 28 वर्षीय महिलेवर बावधन (जि.पुणे) आणि राजापूर (ता. संगमनेर) येथे वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, संशयित महिलेने दिलेल्या कर्जाचे पैसे न देता तिचीच दुचाकी घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागेश गुलाब कराळे (रा. चांडोली फाटा, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित कराळे याने संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 28 वर्षीय महिलेशी ओळख झाली. त्याने तिच्याशी ओळखा वाढवली. त्याने राजापूर येथील पीडित महिलेच्या आईची भेट घेतली. त्यांना संशयिताने महिलेशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने सुमारे पाच वर्ष बावधन (जि.पुणे) व महिलेच्या राहत्या घरी वारंवार बलात्कार केला. त्यातून ती सात महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब संशयितास समजली. त्याने महिलेने व तिच्या आईने काढून दिलेल्या कर्जाचे पैसे न देता महिलेची दुचाकी, दोन वर्षांपूर्वी राजापूर गावात खरेदी केलेल्या मालमत्तेचे खरेदी खत, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे घेऊन फरार झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता महाले करत आहे.

- Advertisement -