घरमहाराष्ट्रनाशिकसप्तश्रृंगीगडावरील घाटात दरड कोसळली

सप्तश्रृंगीगडावरील घाटात दरड कोसळली

Subscribe

जिल्हयातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी गडावरील मार्गातील गणपती घाटात आज दुपारच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र पुन्हा एकदा गडावरील सुरक्षेचा मुददा चर्चेत आला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हयातील काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली.उन्हामुळे दगडांना तडे जातात या दगडांमध्ये पावसाचे पाणी मुरल्याने तप्त दगड आकुंचन पाउन डोंगर सोडून दरड कोसळण्याचा प्रकार हे दर पावसाळयात घडत असतात. लहान आकारांच्या दगड कडयापासून सुटून खाली पडण्याचे प्रमाण कायम असल्याने भाविकांना त्याचा फटका बसू नये म्हणून मंदिराच्या डाव्या बाजूला असलेला कडा संपूर्ण लोखंडी जाळ्यांनी व्यापून खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या चढण्याच्या आणि उतरण्याच्या पाय-यांवर सिमेंट काँक्रिटचे आवरण बनवून आणि बाजूला लोखंडी जाळ्यांचे आवरण लावून सुरक्षेचे काम मंदिर संस्थानने केले आहे. मात्र अजूनही घाटाच्या काही भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. आज दुपारच्या सुमारास गणपती घाटातील दरडीचा काही भाग कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला . अखेर येणारया जाणारया भाविकांनीच दरडीचा काही भाग हटवत रस्ता मोकळा केला.

- Advertisement -

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

गडावरील दरड कोसळणारया घटना लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र संबधित अधिकारी कधीच उपस्थित राहत नसल्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. घाट परिसरात दिशादर्शक फलक लावण्यासह धोकादाय ठिकाणांवर फलक लावण्यात यावे, तसेच रिफलेक्टर लावण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -