घरमहाराष्ट्रनाशिकवनभवन, पीककर्ज, रूग्णवाहिकांच्या प्रश्नांबाबत सचिवांनी घेतला आढावा

वनभवन, पीककर्ज, रूग्णवाहिकांच्या प्रश्नांबाबत सचिवांनी घेतला आढावा

Subscribe

जिल्ह्यातील कामगिरीबद्दल पालक सचिवांनी व्यक्त केले समाधान

जिल्ह्यात वनविभागाच्या कामासाठी एकत्रित वनभवन व्हावे, जिल्हा बँकेकडून शेतकर्यांना पीककर्ज वाटपाबाबत येणार्‍या अडचणींबाबत सामान्य प्रशासन विभाग अपर मुख्य सचिव तथा नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव आनंद लिमये यांनी आढावा घेत जिल्ह्याच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच  कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या जागेवर नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभाग अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. लिमये यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक जिल्ह्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेत जिल्ह्याचे प्रश्न जाणून घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्तीजनक परिस्थिती असतानाही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्व विभागांनी समन्वयाने एकत्रित येऊन वैशिष्ट्यपूर्ण कामे केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. सर्व विभाग प्रमुखांनी टीम वर्कने काम करून नाशिक जिल्ह्यात शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांनी अशाच पद्धतीने काम केले तर आपला जिल्हा आदर्श म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -