पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दुकान जाळले

टेलरचे दुकान, कपडे व शिलाई मशीन जाळून टाकले

chain snatching in kalyan

मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेलेल्या टेलरचे दुकान, कपडे व शिलाई मशीन दोन संशयितांनी जाळून टाकले. ही घटना शुक्रवारी (दि.११) साईमूर्ती कॉम्प्लेक्स, जेलरोड येथे घडली. याप्रकरणी मोहम्मद सलाउद्दीन राहीन यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी दोनजण मोहम्मद राहीन यांच्या कपडे शिवण्याच्या दुकानासमोर आले. ढिकले नावाच्या मुलीला फोन का करता, अशी विचारणा दोघांनी राहीन यांना केली. त्यानंतर दोघांनी मोहम्मद राहीन यांच्यासह कामगारास मारहाण केली. याप्रकरणी राहीन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुकान बंद करून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेले. राहीन तक्रार देण्यास गेल्याचे समजताच दोघांनी त्यांच्या दुकानचे शटर उचकटून शिलाईमशीन, कपडे व इतर साहित्य जाळून टाकले. ते परत दुकानात आले असता त्यांने साहित्य जळालेले दिसून आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. डी. माळी तपास आहेत.